भीमा कोरेगाव : एल्गार परिषदेशी संबंधित कवी वरावरा राव यांना हैदराबादेत अटक


वरावरा राव

Image copyright
Getty Images

प्रतिमा मथळा

वरावरा राव

पुण्याच्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगावात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी नजरकैदेत असलेल्या हैदराबादचे चळवळवादी आणि कवी वरावरा राव यांना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे.

वरावरा राव यांना रात्री 11 वाजताच्या विमानाने पुण्याला घेऊन जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल.

वरावरा राव हे 29 ऑगस्टपासून नजरकैदेत होते. त्यांच्या वकिलांनी राव यांच्या नावे असलेल्या ट्रान्झिट रिमांडला हैदराबाद हायकोर्टात आव्हान दिलं होतं. हा वॉरंट मराठीत असल्याने तो रद्द करण्यात यावा, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

कोर्टाने ही याचिका फेटाळली आणि त्यानंतर वरावरा राव यांना अटक करण्यात आली.

पण कोर्टाने हा ट्रान्झिट वॉरंट रद्दबातल ठरवल्याने ही अटक बेकायदेशीर असल्याचं राव यांचे नातेवाईक आणि पत्रकार एन. वेणुगोपाल म्हणाले.

बीबीसी तेलुगूशी बोलताना वेणूगोपाल म्हणाले, “ही अटक बेकायदेशीर आहे. कोर्टाने याचिकेच्या फारशा खोलात न जाता ट्रान्झिट वॉरंट रद्दबातल ठरवला. जर वॉरंट रद्दबातल आहे तर मग अटक कशी झाली? पुणे पोलिसांचं पथक एक तासापूर्वी आलं होतं. त्यांच्याकडे ना नवीन वॉरंट होता ना कोर्टाचा आदेश. ते म्हणाले की त्याची काही गरज नाही. पोलिसांनी केलेल्या अनेक बेकायदेशीर गोष्टींपैकीच ही एक आहे.”

31 डिसेंबर 2017 ला पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत झालेल्या काही भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, असा FIR पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात एल्गार परिषदेविरुद्ध बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्याअंतर्गत दाखल केला होता.

त्यानंतर ऑगस्टमध्ये पुणे पोलिसांनी पुणे, हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि रांची या शहरांमध्ये धाडी टाकत काही लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक केली होती. जूनमध्ये अटक झालेल्या पाच कार्यकर्त्यांची चौकशी केल्यावर ही नावं समोर आली होती, म्हणून हे धाडसत्र झालं, असं पोलिसांनी नंतर सांगितलं होतं.

यात मुंबईतून व्हर्नोन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा, दिल्लीचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा, नागरी हक्कांच्या वकील सुधा भारद्वाज रांची येथील स्टेन स्वामी यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर कोर्टाच्या आदेशांन्वये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

यापैकी गौतम नवलखा यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

रोहिंग्या मुस्लीम : 'म्यानमारमध्ये परतलो तर आमची हत्या होईल'


म्यानमारमधून बांगलादेशात पळून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्याचा करार बांगलादेश आणि म्यानमार सरकारमध्ये झाला आहे. मात्र रोहिंग्या मुस्लिमांनी घरी परतण्यास नकार दिला आहे. कारण घरी, म्हणजेच पुन्हा म्यानमारमध्ये परतल्यास त्यांची हत्या होईल अशी त्यांना भीती वाटते.

अनेकांची घरं यापूर्वी जाळण्यात आली असून काहींच्या हत्यासुद्धा झाल्या आहेत असा दावा काही रोहिंग्या मुस्लिमांनी यावेळी केला.

बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा बांगलादेशातल्या कॉक्सेस बाझारमधून रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

प्राण्यांमधल्या मादा आपल्याला महिला नेतृत्वाबद्दल काय शिकवतातप्रतिमा मथळा

महिलांच्या नेतृत्वगुणाबद्दल प्राणी आपल्याला काय सांगतात

तरस, व्हेल्स आणि हत्ती यांच्यातलं साम्य तुम्हाला माहिती आहे का? या प्राण्यांच्या गटांचं नेतृत्व त्यांच्यातल्या एका मादांकडे असतं. आणि केवळ याच प्राण्यांमध्ये नाही तर. एका नवीन संशोधनानुसार 5,000 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या ज्ञात प्रजातींपैकी काही मोजक्याच प्रजातींमध्ये मादा नेतृत्व करतात.

पुरुषी वर्चस्वाच्या या विश्वात स्त्रियांना ते असमानतेचं ग्लास सीलिंग तोडून कसं वर येता येईल, यावर बरीच चर्चा सर्वत्र होताना दिसते. मग याचं उत्तर कदाचित प्राण्यांच्या विश्वाचा कानोसा घेतला तर सापडेल का?

प्रथमदर्शनी बघता हे काहीसं वादग्रस्त विधान वाटेल. पण प्राण्यांच्या विश्वाचा हा अभ्यास करणाऱ्यांच्या मते या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच येतं.

प्राण्यांच्या वर्तनाविषयी मिल्स कॉलेजच्या प्राध्यापक जेनिफर स्मिथ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सप्टेंबरमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यांच्या निरीक्षणांनुसार तरस (Hyena), काळा-पांढरा देवमासा (Killer whale), सिंह, ठिपकेदार तरस, बोनोबो माकडं, लिमर माकडं आणि हत्ती या प्राण्यांच्या प्रजातींमध्ये मादा त्यांच्या गटांचं नेतृत्व करतात.

ही निरीक्षणं अचूक येण्यासाठी या अभ्यासकांनी अशा प्राणीसमूहांची निवड केली, ज्यांच्यात सामाजिक वर्तनाची चिन्हं स्पष्ट होती, जशी की कळपाचं नेतृत्व, त्या त्या कळपातल्या हालचाली, शिकार करणं आणि संघर्षं संपवण्याची वृत्ती असणं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : कळपातील हत्ती मेला नि इतर हत्ती शोकमग्न झाले

या निकषांवर त्यांनी जवळपास 76 प्राण्यांच्या प्रजाती निवडल्या आणि त्यांचं निरीक्षण केलं. त्या समूहांमध्येही या अभ्यासकांना मादीच नेतृत्व करत असल्याचं स्पष्टपणं आढळलं आणि या मादी नेतृत्वाचे काही ठळक गुणविशेष निश्चितपणे सांगता येतील, असं दिसलं.

स्मिथ म्हणतात की, “या मानवेतर समाजाकडून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतील, असं मला वाटतं.”

Image copyright
Getty Images

प्रतिमा मथळा

ओर्कासमध्ये माद्या कळपाचं नेतृत्व करतात

पण या निरीक्षणाबद्दल संशोधकांनी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे की या नेतृत्वगुणांची वर्चस्ववादाशी गफलत होता कामा नये. “नेतृत्वाची गरज तेव्हा भासते जेव्हा एखाद्या अडीअडचणीच्या वेळी गटाला एकत्र आणत, त्यात सुसूत्रता आणून त्यांचा समन्वय साधावा लागतो,” असं या शोधनिबंधाचे सहलेखक आणि VU युनिर्व्हसिटी अँम्स्टरडॅममधले उत्क्रांतिवाद मानसशास्त्राचे प्राध्यापक मार्क व्हॅन व्ह्युगट सांगतात.

या अडीअडचणी काहीही असू शकतात. उदाहरणार्थ, अन्नाचा शोध घेणं किंवा हिंस्त्र पशूंशी संघर्ष टाळणं वगैरे. दुसरीकडे वर्चस्ववाद म्हटलं तर एकप्रकारे दोन व्यक्तींमधली स्पर्धाच असते.

या संशोधकांच्या व्याख्येनुसार यशस्वी नेते ते असतात ज्याच्याकडे लोक आपोआप ओढले जातात, ते नव्हे ज्यांना लोकांना आपल्या गटात सामील करण्यासाठी खात्री पटवून द्यावी लागते.

तंटा नको, प्रेम हवं

तब्बल 90 टक्के मानवी जातींचा DNA हा आपले त्यातल्या त्यात नजीकचे म्हणू शकू, असे पूर्वज चिंपांझी आणि बोनोबो माकडांशी मिळताजुळता आहे. पण चिंपांझींमध्ये बहुतेकदा नरच टोळीचं नेतृत्व करताना दिसतो. बोनोबो माकडांचं नेतृत्व मादी करताना दिसते.

क्योटो युनिर्व्हसिटीमधील टाकेशी फ्युरिची या कांगो देशातील बोनोबो माकडांच्या अभ्यासक समजावतात की, मादा टोळीचा प्रवास कसा असावा ते ठरवतात. त्या जेवणाची तरतूद करत असल्यानं पहिल्यांदा त्याच जेवतात.

Image copyright
Getty Images

प्रतिमा मथळा

बोनोबो माकडं

बोनोबो माकडांच्या टोळीत फारसा संघर्ष होत नाही, त्यापेक्षा चिंपांझींच्या टोळीत थोडी मारामारी जास्ती होते. बोनोबो मादी बॉसगिरी करते. नर माकडापेक्षा दिसायला थोडी लहान असते नि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेपही करते.

अनेकदा मादी नरांना धक्काबुक्कीही करते. फ्युरिची सांगतात की, “दोन मादा नरांशी मारामारी करायला लागल्या तर शेवटी शंभर टक्के वेळा मादच विजयी ठरतात.”

पण असं दिसून आलं आहे की, बोनोबो माकडांचा लढण्यापेक्षा किंवा मारामारीपेक्षा जरा प्रेमानं, समजुतीनं घेण्याकडे अधिक कल असतो. या प्रजातीत जवळीक महत्त्वाची असते आणि कधी कधी तर बोनोबो मादा ताण कमी होण्यासाठी वारंवार नर आणि मादांशी सेक्स करतात. म्हणजे टोळीत शांतता नांदवण्याचं मुख्य काम मादा करतात.

दुसरीकडे हत्ती आणि ओर्का व्हेल माशांच्या कुटुंबांमध्ये वयस्कर मादा संसाराचा गाडा हाकतात. ओर्का माशांमध्ये आज्या हुशार असतात, त्या त्यांच्या विस्तारलेल्या मोठ्या कुटुंबाला पोसतात आणि त्यांचे खाद्य असलेला सॅल्मन मासा कुठे आहे, याचा आसमासही घेतात.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भेटा आनंद शिंदेंना, जे हत्तींशी गप्प मारतात!

हत्तींच्या कळपांच्या नेतृत्वागुणांबद्दल केनियातील हत्तींसाठी स्थापन केलेल्या अँबोसेली ट्रस्टमधले शास्त्रज्ञ व्हिकी फिशलॉक सांगतात की, “उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून घेण्याइतपत हत्तींची स्मृती चांगली असते. ऐन दुष्काळातही पाण्याच्या शोधार्थही ज्ञानाचा साठा असणारी त्यांची कुटुंबप्रमुख सगळ्यांसोबत बाहेर पडते.”

पण हत्ती आणि माणसांमधले एक मोठा फरक अधोरेखित व्हायलाच हवा. तो म्हणजे मानवी समाजात पितृसत्ताक पद्धतीमुळं संपत्ती आणि मानमरातबाचा वारसा पुरुषांकडून पुरुषांकडंच जातो. तर हत्तींमध्ये (आणि ओर्कांमध्ये) मातृसत्ताक पद्धत अवलंबली जाते.

सिंथिया मॉस या 1970पासून अँबोसेली ट्रस्ट फॉर एलिफंट या संस्थेच्या संचालक आणि संस्थापक आहेत. त्या सांगतात की, “हत्तीणींचा जन्मच मुळी नेतृत्व करण्यासाठी झालेला असतो. त्यांच्यापुढे ना कुठला पर्याय असतो, ना त्यांना नेते होण्यासाठी नर हत्तींशी संघर्ष करावा लागतो. नर हत्ती वेगळेच राहातात आणि कुटुंबप्रमुख म्हणून हत्तींच्या कळपात ते भूमिकाही बजावत नाहीत.”

तरस बहुतांशी वेळा एकमेकांच्या सहकार्यानं शिकार करतात. शिकारीत नर मुख्य भूमिका बजावतात तर दुसरीकडं मादी भक्ष्यावर ओरडतात. मादी नरांहून मोठ्या आणि बलवान असतात. कळपाचं दिशादर्शन करतात.

भक्ष्यावर ताव मारताना पिलांचा सांभाळ करणारा मादी, मग पिलं आणि त्यानंतर नर, असा प्राधान्यक्रम ठरला असतो. तरस मादीचं नेतृत्व टोळीयुद्धाच्या वेळी पणाला लागतं, विशेषतः जेव्हा असे युद्ध जागेवरून होतात.

स्मिथ सांगतात की तरस मादी एकमेकांच्या पार्श्वभागाला नाकाने हुंगत हाताने खुरचटण्याचा प्रयत्न करतात. हे खरंतर त्यांच्या भाषेत गळाभेटीसारखं असतं.

कालांतराने विश्वासार्ह संबंध झाल्यानंतरही या मादी आणखी एक करार करतात. केव्हाही आक्रमण होऊ शकतं, याची जाणीव असलेल्या तरस एकमेकांशी आघाडी कायम करून कायम हल्ल्यासाठी सुसज्ज राहतात.

Image copyright
Getty Images

प्रतिमा मथळा

तरसांमध्येही मादाच कळपाचं नेतृत्व करते.

आपण आपल्या सहकाऱ्यांना जरी या प्राण्यांप्रमाणे अभिवादन करू शकत नाही तरी आपल्यातही या सस्तन प्राण्यांसारखीच महत्त्वाच्या प्रसंगी युती करण्याची प्रवृत्ती असते. जसं सोशल मीडियावर आपला मित्रपरिवार असतो आणि काही तज्ज्ञमंडळीही त्यांच्या वयोमान, अनुभवांवर आधारित पोक्त सल्ले देतात.

मग या प्राण्यांच्या जगतातून आपण महिलांच्या नेतृत्वाबद्दल काय शिकू शकतो?

प्राण्यांच्या समूहात मादी आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या सहकारितेच्या बंधनांना वाढतं महत्त्व आहे. आणि असं लक्षात येतं की जेव्हा महिला दोन गटांमध्ये गाठ बांधतात, तेव्हा महिला नेतृत्व अधिक सक्षम होतं.

स्मिथ सांगतात की, “मानवी समाजातलं उदाहरण म्हणून सध्याची #MeToo ही चळवळ घेता येईल. त्यात कुणीही सहभागी होऊ शकतं आणि अत्याचाराचं प्रमाण महत्त्वाचं नाही. या वास्तविक परिस्थितीत स्त्रियांनी एकत्र येऊन, संघटित व्हायला हवं. तर त्या नेतृत्वाचा समाजावर काहीएक प्रभाव पडून त्यातून काही चांगलं घडू शकेल. हेच आपण बोनोबो माकडं, तरस आणि एकत्र येणाऱ्या या गटांमध्ये पाहिलं.”

पण या केसाळ प्राण्यांच्या जगाची थेट वर्किंग वुमनच्या जगाशी तुलना खरंच योग्य आहे का?

म्हटलं तर ही कल्पना वादग्रस्त ठरणारी आहे, हे स्मिथ आणि त्यांचे सहकारी स्वीकारतात. ती अडचणीची ठरू शकते, कारण युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टोलमधील ख्रिस्टोस लोआनोयू म्हणतात की, “या संकल्पनेतली क्लिष्टता आणि सामाजिक स्तरांवरचे फरक हे तितकेच महत्त्वाचे आणि दखल घेण्याजोगे आहेत. त्यामुळे एकदम या निष्कर्षाप्रत मारलेली उडी बघता मुळात अशी तुलना करणं अत्यंत कठीण आहे, असं वाटतं.” लोआनोयू हे कलेक्टिव्ह बिहेव्हिअर अँण्ड लिडरशिप या विषयाचे अभ्यासक आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : सावधान, हत्ती- इलो रे इलो

स्मिथ यांची टीम युक्तिवाद करते की स्त्रियांचं नेतृत्व या मुद्दयाकडं अगदी चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. नेतृत्वगुणावर लक्ष केंद्रित करतानाच मोठ्या स्तरावरच्या, गुंतागुंतीच्या अशा उद्योगजगत, शासनयंत्रणा किंवा लष्कर आदी ठिकाणच्या श्रेणीरचना लक्षात घेतल्या गेल्या. पण अन्य काही ठिकाणीही महिलांचं नेतृत्व असतं – कुटुंब किंवा काही लहान गटांमध्येही त्या पुढाकार घेतात, तथापि नेतृत्व आणि पुढाकार हा यातला फरक सूक्ष्मदृष्टीनं पाहता येतो.

अगदी सस्तन प्राण्यांच्या गटात पुरुषांचं नेतृत्व, स्त्रियांचं नेतृत्व हे तसं दुर्लक्षितच राहिलं आहे. युनिर्व्हसिटी ऑफ टोरँटोमधील प्राथमिक वागणुकीच्या अभ्यासक ज्युली टाईक्रोब यांनी व्हर्व्हेट माकडांचा (काळ्या तोंडाची माकडं) अभ्यास केला आहे. या जातीच्या माकडांमध्ये मादीनं केलेलं नेतृत्व, हे मधल्या फळीचं किंवा एकूणच टोळीचं नेतृत्व करणं, ही क्वचित आढळणारी गोष्ट आहे. यात मधल्या फळीचं व्यवस्थापन या मुद्द्याचा विचार करताना आधीच्या अभ्यासात चुकून असं निश्चित केलं गेलं की, निर्णय घेण्याचं काम मुख्यत्वे नरांनी (पुरुषांनी) केलं, असं ज्युली स्पष्ट करतात.

अर्थातच आपल्या जीवशास्त्रात केल्या गेलेल्या अभ्यासाच्या परिपाकानुसार एक बाजू अशीही आहे की स्त्रियांचं नेतृत्व झाकोळलं का गेलं. तर त्याचं उत्तर आपल्या संस्कृतीत आहे. संस्कृतीत बदल करण्यात लोक माहीर असतात आणि त्यामुळं आपल्या भोवतालचं पर्यावरण बदलतं. त्यामुळं स्मिथची टीम वादविवाद करते की आपण आपलं भविष्य घडवू शकतो आणि तेही स्त्रियांना नेतृत्वाची संधी दिली तर.

या अभ्यासातल्या काही कल्पना या प्रत्यक्ष पुराव्यांपेक्षा अधिक चांगल्या आहेत. पण लेखकांच्या मते अधिक कठोर निकषांवर आधारलेला, परिणामकारक असा अभ्यास भविष्यात होणं गरजेचं आहे. तथापी या आठ प्रजातींचं नेतृत्व माद्या (स्त्रिया) करत आहेत आणि एक प्रकारे भविष्यातल्या आशेवर झुलवणाऱ्या अभ्यासाचा हा श्रीगणेशा तर झालेला नाही ना…

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

NPSच्या माध्यमातून असं करा निवृत्तीसाठी नियोजन


निवृत्तीचं नियोजन शक्य तितकं लवकर आणि वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक पर्याय आहे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPSचा. ‘पैशाची गोष्ट’मध्ये जाणून घेऊया NPSचे फायदे आणि यात गुंतवणूक करायची कशी आणि किती?

निवेदक – ऋजुता लुकतुके

लेखक – दिनेश उप्रेती

निर्माती – सुमिरन प्रीत कौर

एडिट – राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

'रोज 200-300 माशा चावतात तरीही आम्ही मध काढायला जातो'


जंगलात जाऊन मध गोळा करणं नेपाळच्या सर्वांत जुन्या आणि पारंपरिक व्यवसायांपैकी एक आहे. पण हे काम जितकं थरारक वाटतं आणि सुखावणारं दिसतं, तितकंच जोखमीचं आहे. नेपाळच्या लामजंग जिल्ह्यात हे गावकरी आपल्या जिवावर खेळून मध गोळा करतात.

त्यांना भीती नाही का वाटत?

ते म्हणतात हो, भीती वाटते, पण शेवटी जो मध मिळतो, तो अनुभव खूप सुखावणारा आहे.

आणि यामुळे इथे पर्यटनालाही चांगली चालना मिळते आहे आणि त्यांना बक्कळ पैसाही लाभत आहे.

पाहा नेहा शर्मा आणि आमिर पीरझादा यांचा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

हा मुलगा पेन्सिलपासून चक्क फर्निचर बनवतो – व्हीडिओ


रंगीत पेन्सिलींपासून शोभेच्या वस्तू, फर्निचर बनवण्याचा बिलालला छंद आहे. तो व्यवसायाने इंजिनिअर आहे.

त्याने पेन्सिलींपासून एक मोठा झोकाही बनवला आहे आणि आणखी बरंच काही बनवलं आहे. आता त्याचं लक्ष्य आहे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

खाशोग्जी खून : प्रिन्स सलमान यांचाच आदेश असल्याचा CIAला संशय


प्रिन्स सलमान

Image copyright
AFP

पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या खुनासाठी सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच आदेश दिले असावेत, असं CIAला अर्थात अमेरिकेच्या ‘सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ला वाटतं. CIAशी संबंधित सूत्रांनी या संदर्भातील पुरावे तपासले आहेत, अशी बातमी अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे.

कोणताही पुरावा नसला तरी अशा प्रकारच्या कारवाया सौदीच्या युवराजांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाहीत, असं CIAला वाटतं.

सौदी अरेबियाने हे दावे फेटाळले आहेत.

दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी खाशोग्जींच्या खुनातील गुन्हेगारांना शिक्षा होईल, असं म्हटलं आहे. पापाऊ न्यू गिनी इथल्या एका परिषदेवेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

खाशोग्जी यांचा इस्तंबूल इथल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात 2 ऑक्टोबरला खून झाला होता. टर्कीचा दावा आहे की खशोग्जी यांच्या खुनाचे आदेश वरच्या पातळीवरून आले होते.

वॉशिंग्टन पोस्टने बातमीत म्हटलं आहे की, “युवराजांचा भाऊ प्रिन्स खालेद बिन सलमानने सौदी अरेबियाच्या अमेरिकेतील राजनयीक अधिकाऱ्याला केलेल्या फोन कॉलच्या आधारावर CIAचं असं मत बनलं आहे.”

खालेद यांनी खाशोग्जींना फोन केला होता असा संशय आहे. त्यांनी खाशोग्जी यांच्या सुरक्षेची हमी घेत त्यांना दूतावासात जायला सांगितलं होतं, असाही संशय आहे. शिवाय त्यांनी हा फोन भावाच्या सूचनेवरून केला होता, असाही संशयव्यक्त केला जातो.

सौदीच्या दूतावासाने हे आरोप फेटाळले आहेत.

या वृत्तावर व्हाईट हाऊस, परराष्ट्र मंत्रालयाने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांना CIAने काढलेल्या निष्कर्षांची माहिती देण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright
AFP

खाशोग्जी यांचा खून केलेल्यांनी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना फोन केल्याचं ही म्हटलं जातं.

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तात संबंधित सूत्राने म्हटलं आहे की, “खशोग्जी यांचा खुनाचा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संबध जोडणारा एकही पुरावा नाही, पण अशा कारवाईसाठी त्यांची परवानगी लागली असणार.”

सौदी अरेबियाचं म्हणणं काय?

रियाध इथं झालेल्या पत्रकार परिषदेत उपसरकारी वकील शलान बिन रजीह शलान यांनी 11 जणांवर गुन्हा नोंद झाला असून यातील 5 जणांना फाशीची शिक्षेची मागणी केली असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, “खशोग्जी यांनी विषारी इंजेक्शन देण्यात आलं, त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे सोपवण्यात आले. “

टर्कीच्या मते हा खून पूर्वनियोजित होता आणि सौदीच्या एजंटांनी हा खून केला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

अवनीचे बछडे राळेगावच्या जंगलात सुखरूपअवनी

Image copyright
Forest Department

प्रतिमा मथळा

अवनीचे बछडे विहीरगाव परिसरात दिसून आले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघीण T-1 अर्थात अवनी वाघिणीला मारल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचं काय झालं, असा प्रश्न वनविभाग, पर्यावरणप्रेमी यांना सतावत होता. पण गुरुवारी वनविभागाला या दोन्ही बछड्यांचे फोटो मिळाले आहेत.

राळेगाव जंगलातील विहीरगाव परिसरात कॅमेरा ट्रॅपने पहाटे हे फोटो टिपले आहेत.

अवनीला 2 नोव्हेंबरच्या रात्री मारण्यात आले. त्यानंतर तिच्या बछड्यांचा भूकेने बळी जाईल की काय अशी भीती व्यक्त होत होती. पण आता या बछड्यांचे फोटो मिळून आल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

टी२ वाघ म्हणजेच या बछड्यांचे वडील वाघाची आंजी, सरवारखेड, विहिरगाव अशी भटकंती सुरू असल्याचं वनविभागाने सांगितलं आहे.

Image copyright
Forest Department

प्रतिमा मथळा

अवनीच्या बछड्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या बछड्यांना पडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे.

हे फोटो अवनीच्या बछड्याचे असल्याचं प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) ए के मिश्रा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

राळेगाव लोणी मार्गावर वनविभागाचा बेस कॅम्प आहे. बेस कॅम्पमधूनच वाईल्ड कन्झर्व्हेटर ट्रस्ट (WCT), स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आणि वनकर्मचारी या बछड्यांना पडकण्याचा प्रयत्न करत आहेत.

Image copyright
Forest Department

प्रतिमा मथळा

अवनीचा बछडा

बोराटी गावाच्या जंगलात बछड्यांना खाद्य मिळावं म्हणून बकऱ्या बांधण्यात आल्या आहे. त्यांच्यावर ट्रॅप कॅमेऱ्याची नजर आहे. परंतु बछड्यानी बकऱ्यांना खाल्ले नाही, ही बाब वनविभागाची चिंता वाढवणारी होती.

चंद्रपूरमधील वाघीण सुखरूप

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर वाघाच्या 3 बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या बछड्यांच्या आईचा फोटो वनविभागाला मिळाला आहे.

Image copyright
Forest Depatment

प्रतिमा मथळा

बछड्यांचा मृत्यू झालेल्या जागेपासून 200 मीटरवर या वाघिणीचा फोटो मिळाला आहे.

बछड्यांचा मृत्यू झाल्याच्या 200 मीटर परिसरात या वाघिणीचा फोटो कॅमेरा ट्रॅपने घेता आला आहे. ही वाघीण बछड्यांचा शोध घेत असल्याने ती हिंस्र होऊ शकते, त्यामुळे गावातील लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

कॅलिफोर्निया आग : आगीची धग, ज्वाळ, अंगार आणि भस्मसात झालेला स्वर्ग


कॅलिफोर्निया आग

Image copyright
AFP/Getty

प्रतिमा मथळा

एखाद्या अॅनिमेशन पटाचा भाग वाटेल अशा या भीषण आगीने कॅलिफोर्नियाचं प्रचंड नुकसान केलं.

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया भागात वणवांमुळे निसर्ग तसंच मालमत्तेचं अपरिमित नुकसान झालं आहे. आगीची धग आता शांत झाली आहे. आगीचे प्रकोप झेललेल्या निसर्गाची अवस्था छायाचित्रांद्वारे टिपली आहे.

कॅलिफोर्निया आगीने केलेलं नुकसान किती भयानक होतं याची साक्ष देणारी दृश्यं.

कॅलिफोर्निया आग

Image copyright
NASA

प्रतिमा मथळा

आगीच्या तडाख्यात निसर्गही सापडला.

कॅलिफोर्निया आगीने निसर्गसंपत्तीचं अतोनात नुकसान झालं.

कॅलिफोर्निया आग

Image copyright
Getty Images

प्रतिमा मथळा

आकाशाला भिडलेल्या आगीच्या ज्वाळा

संपूर्ण आसमंतात आगीचे लोट धुमसत होते.

कॅलिफोर्निया आग

Image copyright
AFP/Getty

प्रतिमा मथळा

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली वास्तू

आगीमुळे बेचिराख झालेलं घर

कॅलिफोर्निया आग

Image copyright
AFP/Getty

प्रतिमा मथळा

आगी शांत झाल्यानंतर नुकसान किती याचा अंदाज येऊ लागला

सैरावैरा पसरलेल्या आगीमुळे मालमत्तेचं विपरीत हानी झाली.

कॅलिफोर्निया आग

Image copyright
Reuters

प्रतिमा मथळा

आगीचे परिणाम

आगीमुळे कॅलिफोर्निया भागाचं अपरिमित नुकसान झालं.

कॅलिफोर्निया आग

Image copyright
AFP

प्रतिमा मथळा

आगीच्या प्रकोपानंतर श्रांत झालेला प्रदेश

कॅलिफोर्निया आग

Image copyright
AFP

प्रतिमा मथळा

आगीमुळे उजाड झालेला प्रदेश

आगीमुळे कॅलिफोर्नियाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link

CBIवर राज्य सरकार बंदी घालू शकतं? जाणून घ्या 9 मुद्द्यांतसीबीआय

Image copyright
PTI

आंध्रप्रदेशात नायडू सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBIवर निर्बंध घातले आहेत. अशाच प्रकारची पावलं ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतला आहे. कोणत्या कायद्याने राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकतात? याचा CBI वर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या 9 मुद्यांत.

1. CBIची स्थापना 1946ला Delhi Police Establishment Act 1946 या कायद्याने झाली आहे.

2. CBIची अखत्यातरीत दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश येतात. या कायद्यातील कलम 6नुसार दुसऱ्या कोणत्याही राज्यात कारवाई करायची असेल तर CBIला त्या राज्याती लेखी परवानगी लागते.

3. आंध्रप्रदेशने पूर्वी एका आदेशाने CBIला राज्यात तपासासाठी सर्वसाधारण आदेश दिली होते. पश्चिम बंगालने असे आदेश 1989ला दिले होते.

4. ज्येष्ठ वकील गौतम अवस्थी सांगतात कायदा आणि सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. पण CBI तपासाच्या आवश्यकतेनुसार केंद्र सरकारच्या विभागांत संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी हस्तक्षेप करू शकते. 10 कोटींवरील भ्रष्टाचाराची प्रकरणं तपासासाठी CBIकडे जात असतात.

5. राज्याने एखाद्या प्रकरणात चौकशीची विनंती केली तर अशा प्रकरणांचा तपास CBI करू शकतं.

6. एखाद्या प्रकरणाच्या तपासाचे आदेश जर उच्च न्यायालयाने CBIला दिले असतील तर अशा प्रकरणांचा तपास CBI करू शकतं.

गौतम अवस्थी सांगतात राज्यांनी CBIवर जरी निर्बंध लादले तरी CBI तिच्या अखत्यातीमध्ये येत असलेल्या प्रकरणांचा तपास करू शकतं. केंद्र सरकारच्या कार्यालयांत कुठंही आणि कोणत्याही राज्यात गुन्हा झाला असेल तर केंद्र सरकार CBIकडे तक्रार देऊ शकते. तिथं CBIला तपास करावा लागेल, त्यासाठी राज्यांच्या अनुमतीची गरज नाही.

7. CBIचे माजी सहसंचालक एन. के. सिंह सांगतात, या निर्णयाचा CBIवर परिणाम होऊ शकतो.

“CBI केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकते. पण एखाद्या राज्यात तपास करायचा असेल, छापा टाकायचा असेल तर राज्याची परवानगी घ्यावी लागेल. समजा राज्याने पूर्वी परवानगी दिली असले आणि नंतर ही परवानगी मागे घेतली, तर त्या दिवसापासून CBI त्या दिवसापासून राज्यात काम करू शकणार नाही.”

Image copyright
PTI

8. राज्य घटनेचे अभ्यासक पी. डी. टी. आचार्य सांगतात, केंद्र आणि राज्यातील संबंध फक्त CBIवर अवलंबून नाहीत.

“केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकार स्पष्ट आहेत. केंद्र सरकारला आवश्यक वाटले तर ते सध्याचा कायदा बदलू शकते. पण सध्याचे कायद्यानुसार CBIला राज्यात काम करताना राज्याची परवानगी लागते. इतर राज्यसुद्धा असा निर्णय घेऊ शकतात,” असं ते म्हणाले.

9. गौतम अवस्थी म्हणतात,”हा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा केंद्र-राज्य संबधाशी निगडित आहे. CBIमध्येच अंतर्गत वाद बाहेर आला आहे आणि लोकांचा त्यावरील विश्वास कमी झाला आहे. CBIचा वापर राजकीय हत्यार म्हणून झाला तर लोकांचा या संस्थेवरील विश्वास डळमळणारच.”

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)Source link